मोठ्या सेलिब्रिटींना सार्वजनिक ठिकाणी जाताना सोबत बॉडीगार्ड ठेवावेच लागतात. परंतु, काही काही वेळा इतकी सुरक्षा असून देखील काही व्यक्ती सेलिब्रिटी पर्यंत पोहचतात. आता एक धक्कादायक प्रकार समोर आला असून विमानतळावर मोठ्या अभिनेत्याला एका व्यक्तीने मारहाण केली आहे.

South actor vijay attack news

हा हल्ला तमिळ अभिनेता विजय सेतुपतीवर बंगळूर विमानतळावर झाला. विजय हा त्याच्या संपू्र्ण टीमसोबत जेव्हा बंगळूर विमानतळावर पोहचला, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसून येत आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालं नसलं, तरी इतका कडेकोट बंदोबस्त असताना देखील हा हल्ला झाल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे. विजय सेतुपती विमानतळावर असताना एक अज्ञात व्यक्ती त्याच्याकडे मागून धावत आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विजय हा विमानतळातून बाहेर जात असताना हल्लेखोर मागून त्याच्याकडे धावत आलेला दिसून आला.

South actor vijay attack news

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तो हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत होता व त्याने नशेतच हा गुन्हा केला आहे. घटनेनंतर तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले. या घटनेमुळे राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे विजय सेतुपती दुखावले आहेत. परंतु, त्यांनी कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली नाही.

South actor vijay attack news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *