सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका टीआरपी मध्ये नेहमीच अग्रेसर असते. या मालिकेतील सर्वच कलाकार आपापली पात्रे उत्तमरित्या साकारताना दिसून येत असतात. जयदीप गौरीच्या प्रेम कहाणीला या मालिकेत उत्तमरीत्या साकारण्यात आले आहे. आता याच मालिकेतील एका अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे.

Sukh mhanje nakki kay asat latest news

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीपचे पात्र साकारणारा अभिनेता मंदार जाधव हा खऱ्या आयुष्यात विवाहित आहे. परंतु, आता मालिकेत त्याच्या लहान भावाचे म्हणजेच उदय शिर्के पाटील हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला.

Sukh mhanje nakki kay asat latest news

उदय शिर्के पाटील हे पात्र साकारणाऱ्या संजय पाटील या अभिनेत्याचा 5 नोव्हेंबर 2021 रोजी साखरपुडा संपन्न झाला. पाडव्याच्या मुहूर्तावर संजय याने अबोली गोखले हिच्यासोबत बंधनात अडकला. अबोली ही एक योगा प्रशिक्षक व ब्लॉगर आहे. स्वतः संजयने इंस्टाग्राम वर पोस्ट करीत आनंदाची बातमी फॅन्ससोबत शेयर केली.

“माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू” असे कॅप्शन टाकत संजयने अबोली प्रती आपले प्रेम व्यक्त केले. दोघांचा साखरपुडा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला. दोघांचा विवाह लवकरच होणार असल्याचे समजते. संजय व अबोली यांना “मर्द मराठी” टीम तर्फे भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

Sukh mhanje nakki kay asat latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *