साऊथच्या चित्रपटात बरेच सीन असे असतात, जे पाहून कोणालाही विश्वास बसत नसतो. परंतु त्याच मुळे साउथ इंडस्ट्री मधून अनेक ॲक्शन हिरो उदयास येतात. रजनीकांत हा अभिनेता तर त्याच्या अविश्वसनीय सीन साठी लोकप्रिय आहे. असाच एक अविश्वसनीय सीन हिंदी मालिकांमध्ये देखील दाखविण्यात आला आहे.

https://mardmarathi.com/2021/11/thapki-pyar-ki-2-viral-scene/

 

कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या “ठपकी प्यार की-2” या मालिकेत एक असा सीन दाखविण्यात आला, जो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या मालिकेत जिज्ञासा सिंग या अभिनेत्रीने थपकी हे पात्र साकारले आहे तर, पूरब हे पात्र आकाश आहुजा या अभिनेत्याने साकारले आहे. या सीन मध्ये पूरबने ज्या प्रकारे थपकीला सिंदूर लावले ते अचंबित करणारे आहे.

कलर्स वाहिनीने प्रदर्शित केलेल्या नवीन प्रोमो मध्ये थपकी जेंव्हा अंघोळ करून बाहेर आल्यास आरशा समोर उभी राहते, तेंव्हा ती स्वतः भांगेत सिंदूर लावणार असते. परंतु, त्याच वेळी मागून तिचा पती पूरब टाइल्स वर पाणी सांडल्याने त्याचा पाय घसरतो व त्याचा तोल अशा पद्धतीने जातो की तो थपकीच्या समोर येतो व बोटात सिंदूर घेऊन थपकीच्या मांगेत भरतो. प्रेक्षकांकडून या सीनची खिल्ली उडवली जात आहे.

Thapki pyar ki 2 viral scene

 

हा सीन सोशल मीडियावर भरपूर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. “रसोडे कोण था” या व्हायरल सीन प्रमाणेच हा सीन देखील व्हायरल होत आहे. गुरुत्वाकर्षण व भौतिकशास्त्र हे सर्व नियमच या सीनने पलटून टाकल्याचे नेटकऱ्याकडून बोलण्यात येत आहे. तसेच, हा सीन पाहून रजनीकांत देखील बेशुद्ध झाला असल्याचे काहींनी म्हंटले आहे.

Thapki pyar ki 2 viral scene

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *