पूर्वीच्या काळी व आत्ताही काही ठिकाणी कलाकारांना दाद म्हणून त्यांच्यावर पैशाची उधळण केलेली पाहायला मिळत असते. लावणी नृत्य, गायन अशा क्षेत्रातील कलाकारांना अशा प्रकारचे अनुभव पाहायला मिळतात. आता एक अशी घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेच्या गायनावर एक प्रेक्षक इतका प्रसन्न झाला की त्याने चक्क तिच्यावर पैशाचा पाऊस पाडला.

Urvashi money rain viral video

ही घटना गुजरात येथील अहमदाबाद शहरात घडली असून एका व्यक्तीने चक्क पाण्यासारखा पास गायन करणाऱ्या महिलेवर पैशाचा पाऊस पाडला. 15 नोव्हेंबर 2021 रोजी तुळशी विवाहच्या निमित्ताने गुजराती गायिका उर्वशी राददिया यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा गायनाचा कार्यक्रम चालू असतानाच तिथे उपस्थित प्रेक्षकांना त्यांचे गाणे खूपच आवडले व त्यांनी पैशाची उधळण करायला सुरू केली. स्टेजवर इतका पैसा होता की पाय ठेवायला देखील जागा दिसत नाही.

उर्वशी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करीत असे म्हणाल्या, “श्री समस्त हिरावाडी ग्रुपच्या वतीने तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वांच्या अमूल्य प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार.” उर्वशी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत असून इतका दिलदार प्रेक्षकवर्ग कसा असू शकतो हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

Urvashi money rain viral video

उर्वशी रदादिया या गुजरातच्या लोकप्रिय लोकसंगीत गायिका आहेत. त्यांना काठीयावाड की कुक्कु या नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी वयाच्या 6 वर्षापासूनच गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. उर्वशीच्या गायनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *