झी मराठी वाहिनीच्या सर्व जुन्या मालिकांनी निरोप घेतल्यानंतर “येऊ कशी तशी मी नांदायला” ही एकमेव जूनी मालिका पुढे सुरू राहिली होती. कारण, ही मालिका इतर मालिकांपैक्षा जास्तच लोकप्रिय होती. परंतु, या मालिकेत स्वीटूचे लग्न ओम सोबत न लावता मोहित सोबत झालेलं दाखविल्याने फॅन्सच्या पदरी निराशाच पडली.

Yeu kashi tashi mi banvayla serial

या मालिकेत ओमची भूमिका अभिनेता शाल्व किंजावडेकर व स्वीटूची भूमिका अभिनेत्री अन्विता फलटणकर यांनी साकारली आहे. स्वीटू या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत होती. परंतु, मालिकेत दोघांमधील वाढलेला दुरावा हे प्रेक्षकांच्या पचनी न पडणारे असेच झाले. त्यानंतर मालिकेत आणखीन एक मोठा बदल करण्यात आला व शकूचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी मालिकेतून निरोप घेतला तर त्यांच्या ऐवजी आता मालिकेत किशोरी अंबिये या दिसून येत आहेत.

किशोरी अंबिये मालिकेच्या सेटवर आल्यापासून त्यांची अन्य कलाकारांसोबत धमाल मस्ती सुरू झाली आहे. आता त्यांचा अन्विता व दिप्ती केतकर(नलू ) सोबतचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी लोकांना वेड लावलेल्या “मनिके हिथे मागे” या गाण्याचा गमतीशीर मराठी व्हर्जन या तिघींनी प्रेक्षकांसमोर आणला. हा व्हिडिओ पाहून फॅन्सना देखील हसू आवरत नाही.

अन्विता ही देखील सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव नेहमीच. तिच्या रील्स व्हिडिओ इंस्टाग्राम वर व्हायरल होताना दिसून येतात. आता या तिघींच्या गमतीशीर व्हिडिओला देखील तितकाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. किशोरी आंबिये यांच्या मालिकेत येण्याने मालिकेवर काय परिणाम होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *