स्टार प्रवाह वाहिनीवरील “सांग तू आहेस का?” या मालिकेने काही काळापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता या मालिकेच्या अभिनेत्रीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. मालिकेची अभिनेत्री भाग्यश्री दळवी हीने काही दिवसापूर्वी लग्न गाठ बांधली असून याबद्दल तिने फॅन्सना सुखद धक्का दिला आहे.

Bhagyashri dalavi marriage news

सांग तू आहेस का? या मालिकेत भाग्यश्री दळवीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या बहिणीचे म्हणजेच दिप्तीचे पात्र साकारली होती. भाग्यश्रीचा विवाहसोहळा 12 डिसेंबर 2021 रोजी प्रतीक याच्या सोबत पार पडला. भाग्यश्री ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये कॉमेडी करताना देखील दिसून आली होती. हा लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला असून लग्नात अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली.

Bhagyashri dalavi marriage news

भाग्यश्री व प्रतीक यांच्या लग्नाला सांग तू आहेस का? मालिकेतील शिवानी रांगोळे, सानिया चौधरी, विराजस कुलकर्णी, गुरू दिवेकर, सुलेखा तळवलकर, दिशा दानडे यांची उपस्थिती होती. तसेच, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या काही कलाकारांनी देखील लग्नाला उपस्थिती लावली होती.

काही महिन्यांपूर्वी भाग्यश्री व प्रतीक यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. आता या दोघांनी लग्नगाठ बांधली असून दोघांवर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. भाग्यश्री व प्रतीक यांना “मर्द मराठी” टीम कडून खूप खूप शुभेच्छा

Bhagyashri dalavi marriage news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *