गेली तेरा वर्ष मनोरंजन विश्वात रेकॉर्ड वर रेकॉर्ड बनवणारी “तारक मेहता का उल्टा चष्मा” ही मालिका सर्वांनाच माहिती आहे. या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी हे या मालिकेचे केंद्रबिंदू आहेत. याच दिलीप जोशी यांच्या कन्नेचा नुकताच लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचे काही फोटोज् समोर आले आहेत.
Jethalal daughter marriage

दिलीप जोशी यांची कन्या नियती जोशी हीचा विवाह सोहळा 11 डिसेंबर रोजी पार पडला. नियतीचे लग्न तिचा प्रियकर यशोवर्धन मिश्रा सोबत झाले. हा लग्न सोहळा मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये उत्साहात पार पडला. या सोहळ्याला “तारक मेहता का उलटा चष्मा” मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Jethalal daughter marriage

52 वर्षीय दिलीप जोशी यांना 1 मुलगा व 1 मुलगी आहे. 27 वर्षीय नियती ही मुलापेक्षा वयाने मोठी आहे. नियतीने लग्नात पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. नियतीचे वडील दिलीप जोशी व आई यांच्या सोबतचे फोटोज् समोर आले आहेत. मुलीच्या लग्नासाठी शुभेच्छा दिलेल्या फॅन्स साठी दिलीप यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Jethalal daughter marriage

“नव दाम्पत्याला शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी सर्वांचे आभार” अशा शब्दात दिलीप जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. “तारक मेहता का उलटा चष्मा” मालिकेतील सर्व कलाकार जरी लग्नाला उपस्थित असले तरी मालिकेत जेठालालच्या पत्नीचा रोल साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही मात्र उपस्थिती नव्हती.

Jethalal daughter marriage

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *