लॉकडाऊन उठविल्यानंतर चित्रपटगृहाना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे परत एकदा चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी होताना दिसून येत आहे. हिंदी सोबतच मराठी चित्रपट देखील प्रदर्शित होताना दिसून येत आहेत. झिम्मा, पांडू हे चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

“झिम्मा” या मराठी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता येत्या 3 डिसेंबरला “पांडू” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार होताना दिसून येत असून हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा भाग असणारा अभिनेता कुशल बद्रिके याने प्रमोशन संबंधित केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Kushal badrike viral post

“पांडू” चित्रपटातील “दादा परत या ना” या गाण्याच्या प्रमोशन साठी कुशलने अशी पोस्ट केली, “मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी गाणं वाजवायला असावं ज्यात मी आहे, असं मला कायम वाटायचं. हे जबर गाणं दिल्याबद्दल अवधूत गुप्ते सर तुम्हाला लय लय धन्यवाद” ही पोस्ट वाचून अनेक फॅन्स दुखावले गेले. असे कॅपशन टाकायला नको होते, असे त्याच्या फॅन्सनी म्हटले.

“असे कशाला म्हणता, तुम्ही खूप जगा आणि जगवा”, “गाणे आवडले पण कॅपशन नाही आवडले”, “तुम्हाला अजून खूप जगायचं आहे. तुमची जागा सदैव प्रेक्षकांचा हृदयात आहे” अशा अनेक प्रेमळ कमेंट्स कुशलच्या पोस्टवर पाहायला मिळाल्या. कुशल हा चला हवा येऊ द्या शो मध्ये जशी भन्नाट कॉमेडी करताना दिसतो, तशीच कॉमेडी तो त्याच्या प्रत्येक पोस्ट मधून करताना दिसत असतो. यावेळी देखील त्याने तेच करण्याचा प्रयत्न केला.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *