काही माणसांचे प्राणी मात्रांवर इतके प्रेम असते की काही काहीजण त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजतात. काही दिवसांपूर्वी नेवासा येथील पाठीवर जन्मजात शिवरायांची प्रतिमा असलेल्या राजेअश्वचे दुःखद निधन झाले होते. राजे अश्वच्या निधनाने अनेकांना दुःख झाले होते. 4 डिसेंबर 2021 रोजी या अश्र्वाचे निधन झाले होते.

Rajeshwar death news

नेवासा येथील शेतकरी नानासाहेब शेंडे यांचा हा अश्व होता. अश्र्वाच्या निधनाने नानासाहेब शेंडे व त्यांच्या कुटुंबाला घरातील एक सदस्य गेल्याने खूप दुःख झाले होते. जगातील सर्वात मोठी संपत्ती माझ्याजवळ होती असे मी समजायचो. राजेअश्वची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे आमच्या कुटुंबातील एक सदस्य गेला असल्याचे नानासाहेब शेंडे यांनी अश्र्वाच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली होती.

Rajeshwar death news

याच राजेअश्वच्या अंत्यविधीचा कार्यक्रम देखील नानासाहेब यांनी पार पाडला. आता याच राजे अश्र्वाचा दशक्रियेचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. वरील फोटो मधील जी पंगत बसविण्यात आली ती पंगत नानासाहेब यांनी एक प्रकारे गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शेकडो लोकांनी या जेवणाचा स्वाद घेतला. तसेच शिवशाहीर कल्याणजी काळे यांच्या शिवचरित्र व्याख्यानाचा व पोवड्याचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. नानासाहेबांनी ज्या प्रकारे राजेअश्व यांचे सर्व विधी पार पाडले त्यामुळे त्यांचे सर्वजण कौतुक करीत आहेत.

Rajeshwar death news

नानासाहेब शेंडे यांनी काही वर्षांपूर्वी एक अश्व मादी आणली होती. तिच्याच वेतातून राजेअश्व जन्मास आले होते. लहान असतानाच या अश्वाच्या पाठीवर शिवरायांची प्रतिमा असल्याचे दिसून येऊ लागले. अश्व मोठा झाल्यास शिवप्रतिमा स्पष्ट दिसू लागली. नंतर या राजेअश्र्वला बघण्यासाठी अनेक जण नेवासा कडे यायचे. त्यामुळेच राजेअश्वच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *