“बचपन का प्यार” हे गाणं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड गाजले होते. हे गाणे सहदेव दिरोदो नामक एका लहान मुलाने गायलेले त्या व्हिडिओमध्ये दिसून येत होते. सर्वत्र याच गाण्याची चर्चा होताना दिसून येत होती. आता त्या सहदेव बाबतीत एक वाईट बातमी समोर आली आहे.

Sahadev accident news

मूळचा छत्तीसगडचा असलेला चिमुकला सहदेव याचा नुकताच मोठा अपघात झाला आहे. सदेवला हाता रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते. एका रोड अपघातात सहदेव याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याचा सध्या जगदलपुर येथील मेडिकल कॉलेज मध्ये उपचार चालू आहेत.

Sahadev bachpan ka pyaar song

सहदेवला घेऊन “बचपन का प्यार” या गाण्याचे व्हर्जन काढणारा प्रसिद्ध गायक बादशहाने देखील स्वीट करीत याबाबत माहिती दिली आहे. “मी सहदेवच्या मित्र परिवाराच्या संपर्कात आहे. त्याची तब्येत सध्या बेशुद्ध असून तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे”, असे गायक बादशाहने म्हटले.

तसेच, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील सहदेवच्या मदतीला धावून आले आहेत. “मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल यांनी सहदेव दिरोदोच्या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करताना सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विनीत नंदनवार यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” त्यामुळे संपूर्ण देशभरातून सहदेव ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करीत आहेत.

Sahadev news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *