गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपी मध्ये अग्रेसर असताना दिसून आल्या. उत्तम कथानक असलेल्या स्टार प्रवाह वाहिनींच्या मालिकांनी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळविले. त्यातच “फुलाला सुगंध मातीचा” ही मालिका टीआरपी मध्ये नेहमीच टॉपला असते. या मालिकेतील शुभम कीर्ती या जोडीमुळे ही मालिका यशस्वी ठरू शकली.

Samruddhi kelkar dance

“फुलाला सुगंध मातीचा” या मालिकेत सध्या कीर्तीला IPS ऑफिसर बनविण्यासाठी शुभम सर्वोपतरी प्रयत्न करताना दिसून आला. अनेक अडचणी नंतर शेवटी कीर्ती या गोष्टींसाठी होकार देताना दिसून आली. मालिकेत नेहमीच साडी वर दिसणारी कीर्ती खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मॉडर्न राहते. सध्या तिचा अशाच मॉडर्न लुक मधील एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत कीर्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव समृध्दी केळकर आहे. समृध्दी ही सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते व ती तिच्या अनेक बोल्ड फोटोज् व व्हिडिओज पोस्ट करताना दिसून येते. सध्या ट्रेडिंग वर असणारा “नाटू नाटू” या साऊथच्या गाण्यावर ती थिरकताना दिसून आली.

Samruddhi kelkar dance

समृध्दी ही अभिनयासोबत ती एक डान्सर देखील आहे. मूळची ठाण्याची असणारी समृध्दी ही अगोदर पासूनच स्टायलिश राहते. ती इंस्टाग्राम वर देखील अशाच लुक मध्ये स्वतःच्या रील्स व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येते. त्यामुळे तिच्या डान्स व्हिडिओना देखील बरेच व्ह्यूज मिळताना दिसतात.

Samruddhi kelkar dance

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *