लोकप्रिय संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की याचा आज वाढदिवस आहे. वडिलांचा संगीताचा वारसा पुढे न नेता आशुतोषने अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रात आपले नाव पुढे न्यायचे ठरविले. आज वाढदिवशी अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत.

Tejashree pradhan birthday
अभिनेता आशुतोष पत्की व अभिनेत्री तेजश्री प्रधान या दोघांनी झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई मालिकेत एकत्र काम केले आहेत. सोहम व शुभ्रा हे पात्र या दोघांनी साकारले होते. आज आशुतोषच्या वाढदिवशी तेजश्रीने शुभेच्छा देताना काही ओळी लिहिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या पार्टनर अशा ओळीने तेजश्रीने सुरुवात केली.

Tejashree pradhan birthday

पुढे आशुतोष हा कोण कोणत्या गोष्टीत पार्टनर आहे हे देखील तिने सांगितले आहे. माझ्या कामात, गुन्ह्यात, सर्जनशीलतेत, लढन्यात, हसण्यात, व्यंगात, गप्पागोष्टीत, जवळजवळ प्रत्येक वेळी. फक्त जंक फूड बाबतीत फसवणूक वगळता . अशा शब्दात तेजश्रीने आशुतोष हा तिच्यासाठी किती स्पेशल आहे हे दाखवून दिले आहे.

आशुतोष ने देखील तेजश्रीचे मजेशीर पद्धतीने आभार मानले. “धन्यवाद. आणखीन पिझ्झा ही एक गोष्ट राहिली” असे आशुतोष म्हणाला. आशुतोष व तेजश्री यांना अनेकजण कमेंट मध्ये दोघांनी लग्न करण्याचा सल्ला देताना दिसतात. परंतु, तेजश्रीने मागे एका मुलाखतीत आम्ही एक चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. आशुतोषला “मर्द मराठी” टीम तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Tejashree pradhan birthday
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *