आईच्या न्यायालयात लेकरांचे सर्व गुन्हे माफ असतात, असे आपण अनेकदा ऐकलं आहे. आपल्या मुलांनी किती जरी वाईट वागले तरी मुलाबाबतीत आईची माया कमी होत नसते. औरंगाबाद येथून एक अतिशय वेदनादायी घटना समोर आली असून ती ऐकून कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.

Aurangabad news latest

शनिवार दिनांक 1 जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सुल परिसरात ही घटना घडली. चंद्रभागाबाई आनंदा साखळे या 90 वर्षीय माऊलीने जगाचा नुकताच निरोप घेतला. चंद्रभागा यांना तीन उच्चशिक्षित व चांगला जॉब असणारी मुलं होती. वीस वर्षापूर्वी तिला याच मुलांनी घरातून हकलून दिले होते. तेंव्हा पासून त्या महिलेचा सांभाळ तिच्या तिन्ही मुलींनी व जावयानी केला होता.

Aurangabad news latest

 

चंद्रभागा यांनी मुलांच्या सर्व चुकांना विसरून निधनापुर्वी अनेकदा आपल्या मुलांना भेटण्याची इच्छा दाखवली होती. परंतु, अनेक कॉल करून देखील या माऊलीच्या मुलांनी एकदाही भेटण्याची तयारी दर्शविली नाही. चंद्रभागा यांच्या निधनानंतर 3 मुलांपैकी 2 मुलांनी अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती लावली होती. परंतु, गावातील लोकांनी व चंद्रभागा यांच्या तिन्ही लेकीनी त्या मुलांना मृतदेहाजवळ येण्यास मनाई केली.

Aurangabad news latest

 

चंद्रभागा यांच्या तिन्ही मुलींनी त्यांच्या जाऊला सोबत घेऊन आईला खांदा दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी या चौघीनी माऊलीचे अंत्यसंस्कार पार पाडले. तिन्ही मुलींचे सध्या सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माहिती आवडली तर कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरु नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.