आज काल लहान मुलांना घडविण्यासाठी खूप साधने उपलब्ध झाले आहेत. त्यात मोबाईल, टिव्ही, संगणक, क्लासेस, शाळा या गोष्टींचा समावेश आहे. परंतु, या सर्वात एका गोष्टीची कमतरता होताना दिसून येत आहे. ते म्हणजे संस्कार. या सर्व गोष्टीला अपवाद ठरत सध्या एक चिमुकली महाराष्ट्रभर गाजताना दिसून येत आहे.

आधुनिक युगात एकीकडे लहान मुलांना इतिहासाचा विसर पडत असतानाच दुसरीकडे देवांशी वाघ नामक एक चिमुकली शिवगर्जना म्हणताना दिसून येत आहे. देवांशीचा व्हिडिओ पाहून तिच्यावर किती उच्चकोटीचे संस्कार झाले आहेत हे समजते. शिवगर्जना म्हणणारी देवांशी वाघ ही नक्की कोण आहे हे जाणून घेऊयात.

 

देवांशी वाघ ही सह्याद्रीचे दुर्गसेवक दादा वाघ यांची कन्या आहे. दादा वाघ हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम करीत असतात. दादा वाघ हे मूळचे बार्शी तालुक्यातील साकत गावचे रहिवाशी आहेत. दादा व त्यांच्या पत्नी दिशा वाघ यांनी देवांशी वर केलेल्या संस्काराची सर्वजण कौतुक करताना दिसून येत आहेत. त्यांनी देवांशीला लहान पणापासूनच छत्रपतींचे संस्कार दिले आहेत.

 

देवांशी ही अगोदर पासूनच शिवरायांना बद्दल आदर करताना दिसून आली. तिला आता छोटी दुर्गसेविका म्हणून ओळखले जाते. तिचा व्हायरल व्हिडिओ जीवधन प्रवेशद्वार लोकार्पण सोहळ्यातील आहे. छोटी दूर्गसेविका म्हणून तिला ओळखले जाऊ लागले आहे. शिवगर्जनेवेळी तिच्या मुखातून निघणारा एक एक शब्द ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नसणार, हे नक्की.

 

माहिती आवडली तर लाईक करून शेयर करायला विसरु नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.