अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार जेंव्हा एखाद्या राजकीय पक्षाबद्दल टीका करतात, तेंव्हा त्यांच्यावर लोकं टीका करायला सुरु करतात. त्यामुळे कलाकार नेहमीच राजकारणापासून दूर राहताना दिसतात. परंतु, सध्या किरण माने या अभिनेत्याला राजकीय पक्षाविरोधात बोलणे चांगलेच महागात पडले आहे.
“मुलगी झाली हो” मालिकेत माऊच्या वडीलाची भूमिका साकारणारा अभिनेता किरण माने यांना नुकतेच मालिकेतून काढण्यात आले आहे. एका वृत्त वाहिनीवर बोलताना किरण माने यांनी भारतीय जनता पक्षा विरोधात बोलल्यामुळे मालिकेतून काढले असावे असे म्हटले आहे. किरण माने हे सोशल मीडियावर नेहमीच व्यक्त होताना दिसून येतात. आता याचा त्यांना चांगलाच फटका बसला आहे.
किरण माने हे भारतीय जनता पार्टी विरोधात नेहमीच पोस्ट करताना दिसून येतात. गेल्यावर्षी देखील याच कारणाने त्यांचा काही नेटकऱ्यांसोबत वाद झाला होता. त्या जुन्या स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसून येत आहेत. 12 जानेवारी रोजी किरण माने यांनी एक पोस्ट केली होती त्यात देखील त्यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपा विरुद्ध व्यक्तव्य केलं होतं.
स्टार प्रवाह वाहिनीने याबद्दल आणखीन स्पष्टीकरण दिले नसले तरी किरण यांनी भाजपचे हे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांनी किरण माने यांच्या या व्यक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. “मी देखील राजकीय पक्षाचा नेता आहे, मी देखील विचार मांडतो. परंतु, मला कधी कोणी या कारणाने कामावरून काढले नाही” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.