माझा होशील ना? या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत सई-आदित्यची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. आता या मालिकेत आदित्य हे पात्र साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. आदित्यचा साखरपुडा एका टिव्ही अभिनेत्री सोबत पार पडला आहे.

Maza hoshil na aditya engagement news

विराजस हा लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे हीच्या प्रेमात असल्याचे गेल्या काही काळापासून ऐकावयास मिळत होते. आता याच प्रेमाचे रूपांतर आता नात्यात झाले आहे. हे दोघे यापूर्वी बऱ्याचदा एकत्र असलेल्या फोटोज् पोस्ट करताना दिसून आले होते. आता दोघांनी साखरपुड्याची फोटो पोस्ट करीत फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे.

शिवानीने विराजसोबत एक फोटो शेयर करीत तिच्या बोटांमधील रिंग दाखवताना दिसत आहे. कॅप्शन मध्ये तिनं म्हटलं आहे की, “Put a ring on it! या दोघांना सर्व फॅन्स व कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

Maza hoshil na aditya engagement news

विराजस या लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. तो अभिनयासोबतच आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच, शिवानी रांगोळे ही नुकतेच सांग तू आहेस का? या मालिकेत दिसून आली होती. विराजस आणि शिवानी या दोघांनी यापूर्वीच म्हणजेच 15 फेब्रुवारी 2020 रोजी इंस्टाग्राम वर एक पोस्ट करून प्रेमाची कबूली दिली होती.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.