आळस हा माणसाचा शत्रू असतो हे आपण अनेकदा म्हणत असतो. परंतु, याच आळसपणा मुळे अनेक समस्या माणसा समोर येत असतात. काही लोक नेहमीच आपल्या आळशीपणाची प्रचिती देताना दिसून येत असतात. सध्या एक अशी फोटो व्हायरल होताना दिसून येत आहे ज्यात एका रोड पेंटरने आपल्या आळशी स्वभावाचे दर्शन दिले आहे.
सदरील फोटो हा पुणे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटो मध्ये रोडच्या कढेला असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या रेषा ओढलेल्या दिसून येत आहेत. परंतु, ती रेषा ओढताना पेंटरने एक मोठी घोडचूक केलेली दिसून आली. या फोटोला झूम करून पाहिले तर त्या रेषेवर एक अंतर्वस्त्र पडलेले दिसून येत आहे.
खरे तर तो कपडा पांढरा रंग देण्यापूर्वीच तिथे होता. परंतु, पेंटरने ते वस्त्र न उचलता त्यावरूनच रंग दिला. यामुळे या पेंटरला घेऊन सर्वजण खिल्ली उडविताना दिसून येत आहेत. काहींनी तर या पेंटरचा शोध घेऊन “सर्वात आळशी व्यक्तीचा” पुरस्कार देण्याचे म्हटले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका