दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी एक अशी घटना घडली की जी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. अनाथ मुलांसाठी संपूर्ण आयुष्यपणाला लावणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री पुरस्कारप्राप्त सिंधूताई सपकाळ (माई) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली व सर्वत्र त्यांच्याच फोटोज् दिसत होत्या. पण माईंच्या अंत्यविधीनंतर सचिन तेंडुलकरची एक फोटो व्हायरल होताना दिसून येत होती.
या व्हायरल फोटो मध्ये असे टाकण्यात आले होते, सचिन तेंडुलकर याने सिंधूताईंच्या पार्थिवाला खांदा दिला असे सांगण्यात आले होते. परंतु, आता त्या फोटो मागचे सत्य समोर आले असून सचिन तेंडुलकरचा जुना असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हायरल फोटो हा सिंधूताई यांच्या अंत्यसंस्काराचा नसून तो फोटो सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यविधीचा होता.
रमाकांत आचरेकर यांचे 2 जानेवारी 2019 रोजी निधन झाले होते. ज्यांनी सचिनला क्रिकेट मध्ये घडविले त्या आचरेकर गुरुजींबद्दल सचिनने नेहमीच आभार मानले होते. त्यामुळे भारतरत्न सचिन तेंडुलकरने त्यांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती. परंतु, काहींनी तेंव्हाचा फोटो सिंधुताई यांच्या अंत्यविधीचा असल्याच्या अफवा पसरविल्या.
सिंधुताई सपकाळ निध्णपूर्वी काही दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. 4 जानेवारी रात्री त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले व त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. निस्वार्थ मनाने हजारो लेकरांना मायेचा आधार देणाऱ्या या माऊलीच्या निधनाचे सर्वानाच दुःख होणे साहजिक होते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.