अनाथ मुलांसाठी आपले आयुष्यपणाला लावणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री पुरस्कारप्राप्त सिंधूताई सपकाळ (माई) यांचे आज दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली असून अनेकांना ही बातमी ऐकून धक्का बसला आहे. निस्वार्थ मनाने हजारो लेकरांना मायेचा आधार देणाऱ्या या माऊलीच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सिंधुताई सपकाळ या गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. आज संध्याकाळी 8 वाजून 10 मिनिटाला सिंधूताईनी जगाचा निरोप घेतला. सिंधुताई यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. याच कारणाने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे माईंचे असे अचानक जाणे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी आहे.
14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. मुलगी नको असताना मुलगीच झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवण्यात आले होते. नंतर लग्न झाल्यास नवऱ्याने घराबाहेर काढल्यानंतर सिंधूताई बाळा कढेला घेऊन रस्त्यावर आल्या होत्या. त्यांनी रस्त्यावरील काही मुलांना देखील जवळ केले व स्वतः भिक मागून अनाथ मुलांचे पोट भरू लागल्या.
बघता बघता त्यांनी हजारो अनाथ मुलांच्या आई बनल्या व त्यांचे उत्तमरित्या पालनपोषण करू लागल्या. सिंधूताई यांनी पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात ममता बाल सदन सुरू केले. सिंधुताई यांना तब्बल 750 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माईंना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.