“सिंधुताई सपकाळ” हे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. अनाथ मुलांचा सांभाळ करीत त्यांचे आयुष्य घडविण्यात सिंधूताईंनी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी याच माऊलीने जगाचा व शेकडो अनाथ मुलांचा निरोप घेतला. सिंधुताईंचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सिंधुताई यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होता. त्यांची तब्येत इतकी खालावली होती, याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. आता माईंचे उपचारा दरम्यानचे काही व्हिडिओज समोर येताना दिसून येत आहेत. या व्हिडिओज मधून समजू शकता येते की माईंची तब्येत किती खालावली होती.
एका व्हिडिओ मध्ये माईंना घास भरवित असल्याचे दिसून आले तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये माईं सोबत त्यांचे नातलग व नर्स हे सर्व बॉल सोबत खेळताना दिसून आले. या व्हिडिओ मधून त्यांचे वजन देखील घटल्याचे दिसून येत आहे. सिंधुताईंच्या कन्या ममता ताई या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत होत्या. परंतु, त्यांनी अखेर 4 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.
सिंधूताई यांनी एकदा म्हटलेले वाक्य अगदी खरे ठरते आहे. “महाराष्ट्रात प्रसिद्ध होण्यासाठी मरावे लागते” हे माईंचे वाक्य खरे ठरले असून माईंच्या निधनानंतर प्रत्येक ठिकाणी फक्त माईंच्या नावाची चर्चा होताना दिसून आली. माईंच्या सर्व पुण्य कामासाठी व समाजसेवेसाठी माईंना काही दिवसांपूर्वीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.