संपूर्ण जीवन स्वतः साठी न जगता अनाथांचे जीवन समृध्द करण्यात व्यस्त राहणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवार दिनांक 4 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली होती. 5 जानेवारी रोजी माईंचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अंत्यविधीसाठी हजारो लोकांनी माईंचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अंत्यविधी कार्यक्रमात माईंच्या पार्थिवाला अग्नी न देता पार्थिव दफन का करण्यात आले असा प्रश्न सर्वांना पडला होता.

 

सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव दफन करण्यामागे पण एक कारण होते. काही वर्षांपूर्वी महानुभाव पंथाची अनुग्रह घेतली होती. त्या पंथाच्या रूढी परंपरे मध्ये अनुग्रह घेणाऱ्या साधकांचे मृत्यूनंतर पार्थिवाला अग्नी न देता दफन करण्यात येत असते. माईंनी देखील इच्छा असल्याचे बोलून दाखविले होते. ही माहिती माईंच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Sindhutai sapkal news latest

एकदा महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी खडकुळी गावात असताना स्वामींच्या एका भक्ताचे निधन झालं. त्यावेळी स्वामींनी त्या भक्ताच्या मृतदेहाला दफन करण्यास सांगितले. तेंव्हा पासून महानुभाव पंथात अशाच पद्धतीने अंत्यविधी करण्यात येत असतो. या विधीला महानुभाव पंथात “भूमीडाग” म्हणतात. त्यामुळे सिंधूताईंनी बोलून दाखविलेली त्यांची इच्छा अखेर पूर्ण करण्यात आली.

Sindhutai sapkal news latest

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताई यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिंधूताईंचे यांचे अंत्यसंस्कार पुण्याच्या नवीन पेठ येथील ठोसरपागा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माईंनी त्यांच्या उभ्या आयुष्यात केलेल्या कार्याला शब्दात मांडणे खूपच कठीण आहे. “मर्द मराठी” टीम तर्फे माईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.