कलाकारांच्या आयुष्यात बरेच किस्से घडत असतात. सार्वजनिक ठिकाणी गेल्यास तर कलाकारांना फॅन्स कडून फोटोज् साठी विनंती करण्यात येत असते. मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी हीने तिच्या सोबत घडलेला असाच एक किस्सा सध्या शेयर केला आहे. हा किस्सा तिच्या हनिमून वेळीचा असल्याचे स्वतः स्पृहाने सांगितले आहे.

Spruha Joshi on Prabhu deva

स्पृहा जोशी हीचा विवाह 28 नोव्हेंबर 2014 रोजी वरद लघाटे यांच्यासोबत पार पडला होता. लग्नानंतर स्पृहा व वरद हनिमून साठी केरळ साठी निघाले होते. त्यांच्या सोबत वरदचा एक मित्र व त्याची बायको हे दोघे देखील होते. मुंबईहून केरळला जाण्यासाठी ज्यावेळी ते चौघे फ्लाईट मध्ये बसले त्यावेळी त्या फ्लाईट मध्ये एका मराठी टूर कंपनीची हनीमून स्पेशल टूर निघाली होती.

टूर कंपनीची टूर असल्याने सर्व महिला एकसारख्या पेहरावात(शॉर्ट्स मेहंदी, लाल चुडे, मेहंदी, भांगेत कुंकू) होत्या. अगदी तसेच स्पृहाचा देखील पेहराव होता. नंतर विमानात सर्वांना समजलं की त्यांच्या सोबत स्पृहा जोशी देखील प्रवास करीत आहे. विमानातून उतरल्यानंतर सर्व प्रवासी तिच्या सोबत फोटोज् काढू लागले. परंतु, महत्त्वाचा किस्सा असा होता की त्याच विमानात सुपरस्टार प्रभुदेवा देखील होता.

Spruha Joshi on Prabhu deva

 

प्रभुदेवा कडे कोणीच बघितले नाही, ना की फोटो काढायला गेले नाहीत तर सर्वजण स्पृहा जोशी सोबतच फोटोज् काढू लागले. स्पृहाने हे हसत हसत सांगितले की त्या दिवशी मी प्रभुदेवाला देखील नमविले होते. हा सर्व घडलेला किस्सा स्पृहा जोशीने “हे तर काहीच नाही” या शो मध्ये सांगितला.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.