यापुढे “माई” हे नाव कधीही ऐकावयास मिळाले तरी प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या डोळ्यासमोर अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांचाच चेहरा येईल. मायेचा आधार हरवलेल्या शेकडो मुलांना सांभाळणाऱ्या सिंधुताई यांच्यावर काही वर्षांपूर्वी एक मराठी चित्रपट देखील येऊन गेला होता. “मी सिंधुताई सपकाळ” या चित्रपटातून सिंधुताई यांची संपूर्ण जीवनकहाणी दाखविण्यात आली व त्याच चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सिंधूताईंच्या भूमिकेत दिसून आली होती.

Tejaswini pandit on Sindhutai sapkal

काल दिनांक 4 जानेवारी रोजी सिंधुताई यांचे दुःखद निधन झाले. माईंच्या निधनाची पोस्ट न केल्याने काही नेटकऱ्यानी तेजस्विनीला पोस्ट का केली नाही असे विचारीत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तेजस्विनीने प्रतिक्रिया देत टीकाकारांचे तोंड बंद केले. “अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काय लिहिलं नाहीस. आपण सोशल मीडियावर माणसाला कसं पटकन जज करतो ना? पण घरातलं कोणी गेल्यास कुटुंबातील माणसांना पोस्ट करण्यासाठी मनस्थिती आणि वेळ असतो का? माझीही अशीच अवस्था झाली” असे तेजस्विनी म्हणाली.

“रात्री ममता ताईंच्या(माईंची मुलगी) फोनवरून बातमी समजल्यानंतर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. प्रतिक्रियेसाठी कॉल येत होते पण काही जड छातीने उचलले तर काही उचलू शकले नाही. कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात नव्हतो. पण आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं.” असे भावूक शब्द तेजस्विनीने माईंसाठी लिहिले.

Tejaswini pandit on Sindhutai sapkal

“(मी सिंधुताई सपकाळ) चित्रपटानंतर काही वेळा माईंना भेटण्याचा योग आला. सर्वांनाच “बाळा” म्हणणाऱ्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. त्या हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. चित्रपट पाहून माई मला म्हणायच्या, मी आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस. घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात त्यांचही एक मोठं कुटुंब आहे. त्यांना वेळ द्या ही विनंती. तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही. माईंच्या कुटुंबाला या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो” असे पुढे तेजस्विनी म्हणाली.

Tejaswini pandit on Sindhutai sapkal

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *