सध्या सोशल मीडियावर कच्चा बदाम या गाण्यावरील डान्स व्हिडिओज प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहेत. मराठी कलाकारांपासून ते बॉलिवुड मधील कलाकारांपर्यंत सर्वच जण या गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. काही मराठी अभिनेत्रींना देखील या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.

“तुझ्यात जीव रंगला” मालिकेत वहिनी साहेबांचे पात्र साकारून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री धनश्री काढगावकर हीने या काच्चा बदाम रिल्स व्हिडिओ बनविला. काही महिन्यांपूर्वी मातृत्व प्राप्त झालेली धनश्री परत एकदा फिटनेस कडे लक्ष देत आहे. धनश्रीने इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट करून या गाण्यावर नाचण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती असे म्हटले आहे.

झी मराठी वाहिनीवरील “मन झालं बाजिंद” मालिकेत कृष्णाचे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात ही देखील कच्चा बदाम गाण्यावर नाचताना दिसून आली. श्वेता ही एक उत्तम डान्सर असून ती नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येते. मालिकेत साधारण पेहरावात राहणारी श्वेता खऱ्या आयुष्यात मात्र मॉडर्न राहत असते.

“मुलगी झाली हो” मालिकेतील सर्वांची लाडकी माऊ म्हणजेच दिव्या पुगावकर हीने देखील कच्चा बदाम गाण्यावर डान्स केला. काही काळापूर्वी मालिकेतील काही कलाकारांचे वाद समोर आले होते. परंतु, त्या गोष्टीचा मालिकेवर काहीही परिणाम न होता मालिका सुरळीत सुरू आहे. दिव्याने कच्चा बदाम वर डान्स व्हिडिओ पोस्ट करीत शेवटी हा ट्रेंड केला असे म्हटले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.