काही दिवसांपूर्वी भारतीय संगीत क्षेत्रातील गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली होती. दीदींच्या निधनाच्या काही दिवसानंतरच लोकप्रिय गायक बप्पी लहरींचे निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे. त्यामुळे 2 आठवड्याच्या आत भारताने संगीतातील दोन अनमोल हिरे गमावले आहेत.
लता दीदी व बप्पी दा या दोघात खूपच जवळचे नाते होते. लता दीदींच्या निधनानंतर बप्पी दा यांनी सोशल मीडियावर दीदी सोबतची एक जुनी फोटो पोस्ट करीत कॅपशन मध्ये “मां” असे लिहिले होते. या दोघांचे जिवंतपणी आई मुलाचे नाते होते, ही गोष्ट स्वतः बप्पी दादांनी एका मुलाखतीतून सांगितले होती. ते लता दीदींना आई म्हणायचे व लता दीदी देखील त्यांना मुलासारखे वागवायचे.
बप्पी दा जेंव्हा 4 वर्षाचे होते तेंव्हा लता दीदी त्यांच्या घरी गेल्या होत्या. बप्पी दादांचे वडील अप्रेश लहरी यांनी संगीत दिलेली अनेक बांगला गाणी लता दीदींनी गायली होती. तेंव्हा पासूनच लता दीदी या बप्पी दादाला ओळखत होत्या. परंतु, आज काळाने या दोन्ही माय लेकरांना हिरावून घेतले. आई पाठोपाठ मुलाने देखील प्राण सोडले.
गेली 5 दशके आपल्या संगीत आणि आवाजाने संगीत क्षेत्रात छाप सोडणारे जेष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. गेल्या 30 दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती व शेवटी त्याच कारणाने बप्पी दा यांचे निधन झाले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.