पंजाब येथील कला सृष्टीतून एक मोठी दुःखद घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या अभिनेता, गायकचे दुःखद अपघाती निधन झाले आहे. मृत अभिनेत्याचे नाव दीप सिध्दू असून तो शेतकरी आंदोलनात खूपच चर्चेत आला होता. हा अपघात मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारीच्या रात्री हरियाणाच्या सोनीपत येथे झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खरखोडा पोलिसांना काल रात्री एका स्कॉर्पियो गाडीचा मोठा अपघात झाला असल्याचे समजले. कुंडली – मानेसर मार्गावर स्कॉर्पिओ एका ट्रकला मागून धडकली होती. यावेळी गाडीत अभिनेता दीप सिध्दू व त्याची होणारी बायको रीना रॉय हे दोघे होते. दोघे पंजाबला वापस जात असतानाच हा अपघात झाला व अपघातात दीप सिध्दू याचे जागीच निधन झाले. तर त्यांची प्रेयसी रीना रॉय जखमी असल्याचे समजते.
या अपघातानंतर पंजाब मध्ये सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत. कालच दीप सिध्दूची प्रेयसी रीना रॉय हीने दोघांची फोटो पोस्ट करीत व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिली होती. दीप सिध्दू हे गेल्या वर्षी कुंडली बॉर्डर वर चाललेल्या शेतकरी आंदोलनात खूप चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने खूप वादग्रस्त कृत्य देखील केले होते.
गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी दीप सिध्दूने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. आता त्याच्या निधनानंतर शेतकरी वर्ग देखील दुःख व्यक्त करीत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.