भारताची गानकोकिळा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या लता मंगेशकर यांचे दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संगीतप्रेमीच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. लता दीदींच्या अंतिम संस्काराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता त्यांच्या निधनापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Lata mangeshkar latest news

लता दीदी गेल्या काही दिवसांपासून दवाखान्यात उपचार घेत होत्या. डिसेंबर महिन्यात लता दीदी यांनी एक गाणे रेकॉर्ड केलं होत. ते गाणे रेकॉर्ड केल्यानंतर काही दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. नंतर त्यांना 8 जानेवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदरील व्हिडिओ हा दवाखान्यातील असल्याचे समजते. एक व्यक्ती त्यांना “दीदी तुमची तब्येत कशी आहे” असे विचारीत आहे. त्यावर लता दीदी मान खाली घालताना दिसून आल्या.

वरी व्हिडिओ वरून स्पष्ट दिसून येत आहे की लता दीदी यांची तब्येत किती जास्त खालावली होती. दवाखान्यात दाखल केल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात लता दीदी यांची प्रकृती बिघडल्यामुळे व्हेंटिलिटर वर ठेवण्यात आले. नंतर लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती व त्यावेळीचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Lata mangeshkar last video

वयाच्या 93व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या लता दीदींनी आपल्या आयुष्यात आपल्या गायकीतून दैदिप्यमान यश संपादन केले होते. अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लता दीदींनी संगीत क्षेत्रात भारताचे नाव रोशन केले. आज लता दीदी जरी जगात नसल्या तरी त्यांची गाणी मात्र कायम अजरामर राहतील, हे नक्की.

Lata mangeshkar last video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *