भारतीय सिनेसृष्टीतील गानकोकिळा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता ही देशवासीयांसाठी हि एक दुःखद घटना आहे. लता दीदी गेल्या काही दिवसांपासून दवाखान्यात उपचार घेत होत्या.
डिसेंबर महिन्यात लता दीदी यांनी एक गाणे रेकॉर्ड केलं होत. ते गाणे रेकॉर्ड केल्यानंतर काही दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. नंतर त्यांना 8 जानेवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या काही दिवसात लता दीदी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले व त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.
कोरोनावर लतादीदीनी मात केली होती. परंतु, परत तब्येत खालावल्याने काल परत एकदा लता दीदींना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. परंतु, अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने कला विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.