संपूर्ण विश्वात जेंव्हा पण सर्वोत्तम गायकांची यादी काढण्यात येईल त्यावेळी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नाव नक्कीच असेल. आज दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी लता दीदी यांचे दुःखद निधन झाले आणि सर्व संगीतप्रेमींच्या आयुष्यात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. इतकी लोकप्रियता मिळविणाऱ्या लतादीदींनी लग्न का केले नव्हते हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.
लता दीदींनी एका मुलाखतीत लग्न का केले नाही याचे कारण सांगितले होते. लहान असतानाच लता दीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले होते. 5 भावंडापैकी लताजी मोठ्या असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. आशा, उषा, मीना, हृदयनाथ या सर्वांचा सांभाळ लता दीदींना करावा लागला. याच कारणाने लता दीदींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
लता दीदींना एका मुलाने लग्नाचा प्रस्ताव देखील दिला होता. पण लताजीनी त्याला नकार दिला होता. “लग्न केल्यास नका सासरी जावे लागेल मग माझ्या भावंडांचा सांभाळ कोणी केलं असतं? आणि शेवटी लग्न, जन्म, मृत्यू या गोष्टी ठरलेल्या असतात, असं माझं मत आहे” असे पुढे लता दीदी म्हणाल्या होत्या.
लता मंगेशकर यांची लहान बहीण गायिका आशा भोसले, भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी देखील अनेकदा लता मंगेशकर यांच्या त्यागा बद्दल बोलून दाखविले आहे. घराची परिस्थिती बिकट असताना दीदींनी आमचं घर सांभाळलं, असे ते म्हणतात. लता दीदीं यांचे संस्कार लाभल्यानेच आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर सारखे मोठे कलाकार अभिनय क्षेत्रात लाभले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.