आपल्या सौंदर्याने व अभिनयाने लाखो मनावर छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस लवकरच आई होणार आहे. गेल्या काही काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेल्या मृणालने स्वतः फॅन्स सोबत ही आनंदाची बातमी शेयर केली आहे. मृणाल ही पती नीरज मोरे सोबत सध्या युनायटेड स्टेट मधील टेक्सास शहरात वास्तव्यास आहे.
“माझिया प्रियाला प्रीत कळेना” या मालिकेतून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या मृणालचा साधेपणा अनेकांना आवडला. अगदी सहजरित्या ती तिची कोणतीही भूमिका साकारताना दिसून येते. मृणालने नंतर 25 फेब्रुवारी 2016 ला अमेरिकेत जॉब करणाऱ्या नीरज मोरे सोबत लग्न केले. आता लग्नाच्या 6 वर्षानंतर मृणाल व नीरज छोट्या बाळाचे आगमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मृणाल व नीरजने सोशल मीडियावर आज पोस्ट करीत असे म्हटले “आम्ही ठरवले आहे की आम्हाला यापुढे झोपायचे नाही, स्वतःसाठी वेळ द्यायचा नाही किंवा स्वच्छ घरात राहायचं नाही. आमचा आनंद वाटेत आहे.” मृणालने सोबत लहान बाळाच्या कपड्याचा व खेळणीचा एक फोटो देखील शेयर केला आहे. मृणाल व नीरजला कलाकारांसोबत फॅन्स कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मृणाल ही मराठी अभिनय क्षेत्रातील रूपवान अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे. तू तिथे मी, हे मन बावरे, अस्स सासर सुरेख बाई अशा अनेक मालिकांमधून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हे मन बावरे या मालिकेनंतर मृणाल वापस अमेरिकेला गेली. त्यानंतर आता तिने ही बातमी देऊन फॅन्स सोबत आनंद द्विगुणित केला.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.