मराठीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची “माझी तुझी रेशीमगाठ” मालिका सध्या लोकप्रियता मिळविताना दिसून येत आहे. मालिकेतील यश व नेहाची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या लग्नातील काही फोटोज् समोर आल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर व सोज्वळ दिसणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे युवा पिढीसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हीने 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 14 नोव्हेंबर 2017 रोजी लोकप्रिय निर्माते आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्याशी विवाह केला होता. हा विवाह सोहळा गोवा येथे पार पडला होता व या सोहळ्याला बऱ्याच मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
वैभव तत्ववादी, सोनाली कुलकर्णी यांच्या सोबत अनेक कलाकार प्रार्थना व अभिषेकच्या लग्नाला उपस्थित होते. दोघांचा विवाह अत्यंत पारंपारिक पद्धतीने झाला होता. लग्नात परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या साडीत प्रार्थना आणखीनच सुंदर दिसत होती. प्रार्थना व अभिषेकने 14-11-17 ही तारीख त्यांच्या बोटावर गोंदवून घेतली आहे.
“अभिषेक आणि माझ्या आवडी निवडी सारख्याच असल्याने तोच माझा चांगला जोडीदार ठरू शकतो, असं मला वाटल्याने मी त्याच्याशी लग्न केलं” असे प्रार्थनाने एका मुलाखतीत सांगितले. अभिषेक हा उत्तम दिग्दर्शक असून तो अनेक तेलगू, हिंदी चित्रपटांचा दिग्दर्शक व निर्माता राहिला आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.