सध्या महाराष्ट्रभर “पावनखिंड” या ऐतिहासिक चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. या चित्रपटाने सुरवातीच्या 4-5 दिवसातच अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. पन्हाळा गड व विशालगड या दोन्ही किल्यांच्या रस्त्यावर असलेल्या खिंडला पावनखिंड म्हणतात. शिलेदार बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित असलेल्या पावनखिंड या चित्रपटात रायाजीची दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या बद्दल आज आपण जाणून घेऊयात.
पावनखिंड चित्रपटात पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या रायाजींची भूमिका अंकित मोहन या अभिनेत्याने साकारली आहे. चित्रपटातील अंकित याच्या भूमिकेचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होताना दिसून येत आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या सोबतच रायाजी बांदल यांनी देखील पावनखिंडीत आपले बलिदान दिले होते. रायाजी यांचे पात्र अंकितने उत्तमरित्या सादर केले आहे.
अंकित मोहन याची पत्नी देखील मराठी अभिनय क्षेत्रात असून तिचे नाव रुची सवर्ण आहे. खरे तर रुची ही देखील पावनखिंड चित्रपटात असून ती सोयराबाई हे पात्र साकारताना दिसून आली आहे. अंकित व रुची या दोघांनी यापूर्वीही “फतेशिकस्त” या ऐतिहासिक मराठी चित्रपटात दिसून आले होते. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची या दोघांना आवड असल्याचे दिसून येत आहे.
रूची सवर्ण व अंकित मोहन या दोघांचा विवाह 2 डिसेंबर 2015 रोजी झाला होता. रूची सवर्णने मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. कुंडली भाग्य, घर आजा परदेसी कुंकुम भाग्य या काही गाजलेल्या हिंदी मालिकेत रुचीने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. अंकित मोहन याने देखील अनेक मालिका व चित्रपटात काम केले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.