उत्तरप्रदेश येथील निवडणुका आल्या की सर्वप्रथम “ती” पिवळ्या साडी मधील महिला डोळ्यासमोर येते. कारण, लखनऊ मधील गेल्या काही निवडणुका मध्ये पिवळ्या साडी मधील एक बूथ अधिकारी महिलेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्या महिलेचे नाव रीना द्विवेदी असून ती सध्या राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका वेळी परत दिसून आली आहे.

Pili saree madam

रीना द्विवेदी या लखनऊ येथील बांधकाम विभागात कार्यरत आहेत. त्या लखनऊ मध्ये झालेल्या मागील स्थानिक निवडणुकी वेळी खूपच चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या सौंदर्याची व आकर्षक लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसून आली. रीना या आता तर त्या चक्क जीन्स मध्ये दिसून आल्या आहेत.

सध्या रीना यांची ड्युटी मोहनलालगंज विधानसभाच्या गोसाईगंज बूथ वर चालू आहे. पिवळ्या साडी मधील रीना आता वेस्टर्न कपड्यात आली आणि बूथ वर बघ्यांची गर्दी झाली. पत्रकार, जनता हे सर्वजण रीना यांच्या भोवती गर्दी करताना दिसून आले. 2019 नंतर रीना सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाल्या व त्या त्यानंतर अनेक व्हिडिओज पोस्ट करताना दिसून येतात.

2019 च्या निवडणुका वेळी एका पत्रकाराने रीना यांची फोटो घेतली व ती सोशल मीडियावर पोस्ट केली. ती फोटो देशभरात व्हायरल झाली. अनेकांनी त्यावेळी गमतीत असे म्हटले की, “बूथ वर जर अशा महिला अधिकारी असतील तर मतदान 100% होणार.” यावेळी रीना यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Pili saree madam
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *