झी मराठी वाहिनीवर सध्या चालू असलेली “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका चांगलीच लोकप्रियता मिळविताना दिसून येत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांनी यश व नेहा हे पात्र उत्तमरित्या साकारले आहे. नेहाची भूमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडिया वर तिच्या हटके फोटोज् साठी चर्चेत आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर व सोज्वळ दिसणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे युवा पिढीसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते. मालिकेत नेहमीच साधारण कपड्यात दिसणारी प्रार्थना खऱ्या आयुष्यात मात्र मॉडर्न लुक दाखविताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून प्रार्थनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर “नवीन मी” असे कॅपशन टाकून फोटोज् व व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत.
आपल्या मनमोहक चेहऱ्याने नेहमीच फॅन्सला आकर्षित करणाऱ्या प्रार्थनाचा हा नवीन लुक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या करियर मध्ये प्रार्थना कधीही बोल्ड पात्र साकारताना दिसून आली नाही. ती साधारण लुक मध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच सुंदर मॉडर्न लुक मध्ये देखील दिसत आहेत.
“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेत सध्या यशची विदेशातील मैत्रीण आल्याने नेहा यश वर चिडताना दिसून येत आहे. परंतु, यश मात्र नेहाकडे जवळीकता निर्माण करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही भागात दोघांमधील प्रेमाचे क्षण पाहायला मिळणार, हे नक्की आहे. प्रेक्षक देखील त्याच क्षणाची वाट पाहत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.