आपल्या अभिनयाने एक सुवर्ण काळ गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच अभिनय क्षेत्रासह सर्व रसिक प्रेक्षक हळहळ व्यक्त करीत आहेत. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्हणून त्यांनी मराठी कला सृष्टीला सोनेरी दिवस दाखविले आहेत. दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात दुपारी अडीच वाजता त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

Ramesh deo last video

 

रमेश देव यांच्या निधनाची वार्ता त्यांचे चिरंजीव अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सगळीकडे त्यांच्याच फोटोज व व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत ते शेवटचे नाचताना दिसून येत आहेत. वयाच्या 93 वर्षात देखील अभिनया प्रती किती प्रेम होते हे या व्हिडिओ मधून दिसून येत आहे.

हा व्हिडिओ काही काळापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सिनेमातील देव या कार्यक्रमातील आहे. रमेश देव यांच्या कुटुंबातून अभिनय क्षेत्रात पत्नी सीमा देव, मुलं अजिंक्य देव व अभिनय देव यांचे मोठे योगदान आहे. रमेश व सीमा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम देखील केले आहे. रमेश देव यांच्या निधनाने पत्नी सीमा व त्यांच्या दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला आहे.

Ramesh deo last video

रमेश देव यांचं खरं नाव ठाकूर होते व ते मूळचे राजस्थान येथील आहेत. त्यांचे वडील कोल्हापूर येथे फौजदारी वकील होते. नंतर राजश्री शाहू महाराजांनी त्यांचे नाव बदलून देव दिले होते. रमेश देव यांनी मराठी सोबतच अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आनंद चित्रपटात त्यांनी साकारलेले पात्र विशेष गाजले होते. या रुबाबदार अभिनेत्याला “मर्द मराठी” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *