कोरोना काळापासून अनेक गरजूंना सर्वोतोपरी मदत करणारा देवदूत म्हणजेच अभिनेता सोनू सूद हा सर्वानाच माहिती आहे. कोरोना काळात अडकलेल्या परप्रांतियांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी सोनू सूद देवदूता सारखे मदतीला धावून आला होता. त्यानंतर त्याच्या घराबाहेर अनेकजण मदतीची हाक मारत उभे राहताना दिसून आले. त्या सर्वांना सोनू सूद आपुलकीने मदत करताना दिसून आला.

Sonu sood latest news

आज सोनू सूदच्या माणुसकीचे आणखीन एक उदाहरण समोर आले आहे. सोनू सूदने रस्त्यावर जखमी झालेल्या एका व्यक्तीला स्वतः उचलून नेऊन स्वतःच्या गाडीत बसविले व त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. ही घटना पंजाब येथील मोगा जिल्ह्यातील आहे. मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी उशिरा दोन कारचा मोठा अपघात झाला. यात एका कार मधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता.

 

सोनू सूद देखील त्याच वेळी तिथे देवासारखे त्या व्यक्तीच्या मदतीला धावून आला. त्याने क्षणाचाही विलंब न करता जखमीला दवाखान्यात घेऊन गेला व वेळेवर उपचार केल्याने त्या व्यक्तीचे प्राण देखील वाचले. माणुसकी काय असते हे सोनू सूद ने परत एकदा दाखवून दिले. चित्रपटात जरी तो सारखेच वीलनच्या भूमिकेत दिसत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो अनेकांसाठी हिरोच आहे.

Sonu sood latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *