स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या मालिकेने सुरुवाती पासूनच घवघवीत यश मिळविले आहे. 1 वर्षापूर्वी सुरू झालेली ही मालिका नेहमीच टीआरपी मध्ये अग्रेसर राहिलेली दिसून आली. या मालिकेतील सर्वच कलाकार आपापले योगदान देताना दिसून येत असतात.

Sukh mhanje nkki kay asat

गौरी व जयदीप या जोडीला देखील खूपच लोकप्रियता मिळालेली दिसून आली. तसेच, या मालिकेत मल्हार व शालिनी हे पात्र साकारणारे कलाकार सोशल मीडियावर खूपच ॲक्टीव असतात. या मालिकेत मल्हार हे पात्र अभिनेता कपिल होनराव ने साकारले असून शालिनी हे पात्र माधवी निमकर या अभिनेत्रीने साकारले आहे. मल्हार व शालिनीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मालिकेत जरी शालिनी व मल्हार यांचे विचार एकमेकांना पटत नसले तरी दोघांनी “पहला पहला प्यार है” या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसून आले. या व्हिडिओ वर अनेक फॅन्सनी दोघांचे भरभरून कौतुक केले. काहींनी तर या दोघांची जोडी जयदीप गौरी पेक्षा मस्त असल्याचे म्हटले.

Sukh mhanje nkki kay asat

“सुख म्हणजे काय असतं?” मालिकेत सध्या मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळत आहेत. गौरी व जयदीप हे सरोगसी मार्फत बाळाला जन्म देणार असल्याचे दाखविण्यात आले. परंतु, नवीन प्रोमोमुळे सर्व फॅन्स चकित झाले आहेत. या प्रोमो मध्ये जयदीप गौरीला खोल दरीत ढकलून दिल्याचे दाखविण्यात आले आहे. हे सत्य आहे की स्वप्न हाच प्रश्न फॅन्स ना पडला आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.