सध्या सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका महिलेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये ती महिला आपल्या बाळाला समोर घेऊन गाडी चालवताना दिसून येत आहे. या महिलेचे नाव रेश्मा असून हा व्हिडीओ केरळ राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

Swiggy lady with baby

केरळच्या एर्णाकुलम शहरातील रोडवर रेश्मा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करते. रेश्मा ही कोल्लम जिल्ह्यातील चिन्नाक्कडा येथील एर्नाकुलममधील एडप्पल्ली येथील रहिवासी आहे. मात्र, रेश्माला तिचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्याची माहिती नव्हती. हा व्हिडिओ तिच्या मैत्रिणीने पोस्ट केला होता.

4 वर्षापूर्वी रेश्मा ही एका व्यक्ती सोबत लग्न करून कोची मध्ये आली होती. प्रेम विवाह केल्यामुळे तिच्या घरचे तिला सहकार्य करीत नव्हते. डिप्लोमा केल्यानंतर रेश्माने काम करण्याचे ठरविले. तिचा नवरा राजू यूएई मध्ये एका हॉटेलमध्ये काम करतो व तिला दर महिन्याला थोडेफार पैसे पाठवीत असतो. पण त्या पैशात घरभाडे आणि इतर खर्च भागत नसल्याने रेश्माला फूड डिलिव्हरी करावी लागत आहे.

Swiggy lady with baby

“कामाचा एक भाग म्हणून उन्हात फिरत असताना तिच्या मुलाला सोबत घेऊन जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नाही. मी बाळाला आठवड्यातून सहा दिवस डे केअर सेंटरमध्ये सोडते. रविवारी मुलाला सांभाळायला कोणी नसल्यामुळे बाळाला सोबत घेऊन जावे लागते, असे असे तिने म्हटले.

Swiggy lady with baby


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *