झी मराठी वाहिनीवर 20 मार्च 2020 पासून “तू तेव्हा तशी” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी व अनुभवी अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. परंतु, या मालिकेत आता आणखीन कोण कलाकार आहेत हे आणखीन लपविण्यात आले आहे. परंतु, आता या मालिकेत आणखीन एक लोकप्रिय अभिनेत्री दिसून येणार आहे.
तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना या मालिकेतून लोकप्रियता मिळविणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही देखील या मालिकेचा भाग असणार आहे. अभिज्ञा भावे ही नुकतेच काही हिंदी मालिकांमधून दिसून आली होती. आता परत एकदा ती मराठी मालिकेत पुनरागमन करताना दिसणार आहे. तिच्या लग्नानंतरची ही तिची पहिलीच मराठी मालिका असेल व यासाठी ती खूप उत्सुक असल्याचे तिने म्हटले आहे.
अभिज्ञाला यापूर्वी प्रेक्षकांनी खलनायिकेच्या भूमिकेत पाहिलं होते, परंतु आता ती आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. अभिज्ञाने शिल्पा तुळसकर या अभिनेत्री सोबत यापूर्वी तुला पाहते रे या मालिकेत एकत्र काम केले होते. आता ती परत एकदा शिल्पा सोबत व अभिनेता स्वप्नील जोशी सोबत काम करताना दिसणार आहे. मालिकेच्या प्रोमो वरून मालिका उत्तम वाटत असल्याचे प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.