झी मराठी वाहिनीवर सध्या “तू तेंव्हा तशी” या नवीन मालिकेचा प्रोमो प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशी व अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. “तू तेंव्हा तशी” ही मालिका येणार असल्याने “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Yeu kashi tashi mi nandayla

“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिका येत्या काही दिवसात संपणार असल्याने मालिकेचे फॅन्स मात्र दुःखी झाले आहेत. फॅन्स सोबतच या मालिकेतील कलाकार देखील भावूक झालेले पाहायला मिळत आहेत. नुकतेच मालिकेची शूटिंग देखील संपली असून सेटवर शेवटच्या दिवशी काही कलाकार रडताना दिसून आले. मालिकेत स्वीटूचे पात्र साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर हीने भावूक होवून एक गाणे देखील गायले.

मालिका संपतेय, याबद्दल तुला कसे वाटेल? या प्रश्नावर उत्तर देताना अन्विता म्हणाली, “मालिका सुरू होण्यापूर्वी वाटले नव्हते की इतके प्रेम मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. मी मालिकेतील सर्व कलाकारांना खूप जास्त मिस करेल. मेकअप रूम मधील दीप्ती ताई(नलू), शुभांगी ताई(सुमन) आम्ही सगळे खूप धमाल करायचो ते खूप मिस करेल.”

Yeu kashi tashi mi nandayla

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेला मध्यंतरी पर्यंत फॅन्स कडून उत्तम प्रतिसाद मिळत होता. परंतु, मालिकेच्या शेवटी टीआरपी घसरण झालेली पाहायला मिळाली होती. तसेच, मालिकेत शेवटी स्वीटू व ओमकार यांना एकत्र पाहता आल्याने फॅन्स मध्ये थोडे समाधानाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, येत्या 18 मार्च रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Yeu kashi tashi mi nandayla

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *