काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर जवळपास सर्व जुन्या मालिका बंद करून नवीन मालिका सुरू करण्यात आल्या होत्या. नवीन मालिका आल्यामुळे झी मराठी वाहिनीच्या टीआरपी मध्ये चांगली सुधारणा झालेली पाहायला मिळाली. झी मराठी वाहिनीवर आता आणखीन एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेचा प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
“तू तेंव्हा तशी” असे नवीन मालिकेचे नाव असून या मालिकेत लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी व अभिनेत्री शिल्पा तुळसकर दिसून येणार आहेत. मालिकेची शूटिंग सुरू झाली असून ही मालिका 20 मार्च पासून संध्याकाळी 8 वाजता प्रसारित होणार आहे. नवीन मालिका येणार असल्याने “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका संपणार की मालिकेचा वेळ बदलणार याची चर्चा सुरू झाली होती. पण आता त्याचे उत्तर मिळाले आहे.
1 वर्षापूर्वी सुरू झालेली “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका बंद होणार आहे. त्यामुळे येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या फॅन्स साठी हि एक दुःखद बातमी आहे. या मालिकेने उत्तम प्रेक्षकवर्ग जमविला होता. काही दिवसापूर्वीच मालिकेत ओम व स्वीटू यांचे लग्न झालेले दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांची प्रेम कहाणी काहीच दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
सध्या टीआरपीच्या आकडेवारीत माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका वगळता झी मराठीची एकही मालिका टॉप 10 मध्ये नाही. “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं”, “मन झालं बाजिंद” या मालिकांना हवे तितके यश मिळविता आले नाही. “मन उडू उडू झालं” या मालिकेने मात्र बऱ्या पैकी यश मिळविले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.