सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून “कच्चा बादाम” हे गाणे सर्वत्र ऐकायला मिळत होते. सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटी पर्यंत अनेक जण या गाण्यावर थिरकताना दिसून येत होते. “भूबन बड्याकर” या बदाम विकणाऱ्या या व्यक्तीने ग्राहक आकर्षित व्हावा यासाठी तो ओरडताना दिसून आला व त्याचे हे गायन चांगलेच व्हायरल झाले होते. परंतु, आता भूबन बद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे.
कच्चा बादाम गाणे गाणारा भूबनचा नुकताच मोठा अपघात झाला आहे. परंतु, सुदैवानं या अपघातातून तो थोडक्यात बचावला. भूबन हा एक जूनी कार घेऊन चालविण्यास शिकत होता. परंतु, कार शिकत असताना त्याच्या कारचा अपघात झाला व या अपघातानंतर त्याच्या छातीला व आणखीन दोन ठिकाणी जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सध्या भूबन याला पश्चिम बंगाल मधील बीरभूम मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी “बचपन का प्यार” गाणं गाणाऱ्या सहदेव या लहान मुलाचा देखील अपघात झाला होता. त्यामुळे योगा योगाने सोशल मीडियावर अचानक प्रसिध्दी मिळविणाऱ्या या दोघांचा अपघात झाला.
भूबन याच्या कडून कच्चा बदाम गाणे गाऊन घेणाऱ्या म्युझिक कंपनीने त्याला चार लाख रुपयांचा चेक दिला होता. त्यानंतर त्याला अनेक टिव्ही शो मध्ये बोलवण्यात आले होते. प्रसिध्दी मिळाल्यामुळे भूबन हा बदाम विकणे देखील बंद केला होता. परंतु, अचानक आज त्याच्या अपघाताची वार्ता समोर आली.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.