अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांना अभिनया व्यतिरिक्त एखादा व्यवसाय करण्याची आवड असते. काहीजण व्यवसायात यशस्वी होतात तर काहींना नुकसान होत असते. परंतु, एक मराठी अभिनेत्री सध्या शेती व व्यवसाय क्षेत्रात घवघवीत यश संपादन करताना दिसून येत आहे.

मुळशी पॅटर्न चित्रपटात चहाची टपरी चालविणारी सुंदर अभिनेत्री आठवली का? या अभिनेत्रीचे नाव मालविका गायकवाड असून ती सध्या व्यवसायातून स्वतःचे नशीब बदलताना दिसून येत आहे. खरे तर मालविका ही एक इंजिनिअर आहे. तिने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी देखील केली. परंतु, तिला नोकरीत जास्त आवड नव्हती. निसर्गाशी जवळीकता वाढवणाऱ्या शेती मध्ये मालविकाला जास्त आवड होती.

Malvika latest news

याच कारणाने मालविकाने नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. मालविका हीने ज्यावेळी शेती करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तिला काही नातेवाईक व मित्र मंडळींनी तिला वेड्या काढले. मात्र तिने याच गोष्टीला आव्हान समजत शिरूर येथे दीड एकर शेती खरेदी केली व त्या जमिनीत सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला.

मालविकाने विशाल चौधरी व जयवंत पाटील या 2 मित्रांना सोबत घेऊन दुग्ध व्यवसायात उतरली. या तिघांनी “हंपी ए 2” नावाची कंपनी सुरू करीत त्यात ते अनेक दुग्ध पदार्थांची विक्री करू लागले. सध्या त्यांच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल 24 करोड असून वार्षिक नफा जवळपास 4 करोड रुपये आहे. व्यवसायात यशस्वी होवून सुरुवातीला तिला नावे ठेवणाऱ्यांची तिने तोंड बंद केली, हे नक्की.

Malvika latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *