पुणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या मेट्रोचा लोकार्पण सोहळा 6 मार्च रोजी पार पडला. या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. पुण्यात कोणतीही गोष्ट घडली की त्याची चर्चा सर्वत्र होतच असते. मेट्रो सुरू झाल्यापासून अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आले आहेत.
एका व्हिडिओ मध्ये महिला मेट्रो मध्ये गाणे गाताना दिसून आल्या, तर एका व्हिडिओ मध्ये महिला मेट्रो मद्ये भांडताना दिसून आल्या. आता एका आजोबाचा व्हिडिओ समोर आला असून त्यात आजोबांनी टिपिकल पुणेरी शब्दात पत्रकाराला उत्तर दिले आहे. पुण्यातील लोकं हे नेहमीच त्यांच्या आगळ्या वेगळ्या बोली साठी प्रसिद्ध आहेत. आता या आजोबांच्या व्हिडिओ वरून परत एकदा सिद्ध झाले आहे.
एक आजोबा पुण्यातील मेट्रो मधून प्रवास करताना एका व्यक्तीने त्यांना “मेट्रोने प्रवास करून कसे वाटतंय तुम्हाला?” असा प्रश्न विचारला. ते आजोबा जरा वेळ त्या व्यक्तीकडे पाहिले व त्यांनी म्हटलं, “आत्ताच बसलोय, परत या” असे खोचक उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र शेयर होताना दिसून येत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका