माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे या दोघांमुळे ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या दोघांसोबतच मालिकेत छोट्या परीने देखील मालिकेच्या यशात हातभार लावला आहे. आता याच परीच्या घरी आता आलिशान कार आली आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत परीची भूमिका साकारणाऱ्या मायरा वायकुळ ही मागील काही एपिसोड्स मध्ये मालिकेत दिसून आली नव्हती. आता परत एकदा ती मालिकेत परतली आहे. मालिकेत कमबॅक करणाऱ्या मायराच्या आई वडिलांनी एक कार खरेदी केली आहे. ही कार टाटा कंपनीची असून ती एक इलेक्ट्रिक एसयूव्ही कार आहे. सध्याच्या सर्वोत्तम कारच्या यादीत ही कार अग्रेसर मानली जाते.
मायराचे वडील गौरव वायकुळ व आई श्वेता वायकुळ यांनी खरेदी केलेल्या या कारची किंमत तब्बल 14 लाख असल्याचे समजते. या कारचा जो नंबर आहे त्या मागे देखील एक गुपित लपले आहे. 1660 हा नंबर मायराच्या आई श्वेता यांच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण, काही दिवसांपूर्वी श्वेता यांच्या वडिलांचे निधन झाले होते व त्यांची जन्मतारीख 1-6-1960 ही होती.
“1 जून 1996 हा नंबर आम्हाला खूप कष्ट करण्यासाठी उत्साह देईल. मिस यू पप्पा” अशा शब्दात श्वेता यांनी वडिलांबद्दल भावना व्यक्त केल्या. श्वेता व गौरव यांनी मायराला अभिनय क्षेत्रात उतरवून उत्तम निर्णय घेतला. कारण, इतक्या छोट्या वयात मायराच्या अभिनयाचा लाखो लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.