बॉलिवूड मधील काही कलाकारांनी गेल्या काही काळात लग्न बंधनात अडकल्याचे आपण पाहिले. तसेच काही कलाकार एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चर्चा होताना दिसून येतात. परंतु, सध्या बॉलिवुड अभिनेता सलमान खान व अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सलमान खान व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी दबंगच्या तिन्ही चित्रपटात एकत्र काम केले आहे. कालपासून एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात सलमान खान हा सोनाक्षी सिन्हा हिला अंगुठी घालताना दिसून येत आहे. परंतु, हा फोटो पूर्णपणे खोटा असल्याचे सोनाक्षीने त्यावर कमेंट केल्यानंतर समजले.
इंस्टाग्राम वर बॉलीवुड टशन या हॅण्डलने हा फोटो पोस्ट करीत “सूत्रानुसार सलमान व सोनाक्षी एका दोघांनी गपचुप लग्न केले”, असे कॅपशन टाकले. हा फोटो इतका व्हायरल झाला की चक्क सोनाक्षी जवळ जाऊन पोहचला. त्यावर सोनाक्षी सिन्हाने हीने अशी कमेंट केली. “तू वेडा आहेस का, की तू वास्तविक आणि मॉर्फ केलेले चित्र यातील फरक सांगू शकत नाही?
सोनाक्षीने खोटी फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला दबंग स्टाईलने उत्तर दिले. त्यामुळे अनेक अफवांवर पूर्णविराम मिळाला. सोनाक्षीला यापूर्वीही अनेकदा सलमान सोबत लग्न करणार अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर सोनाक्षी नेहमीच हसत हसत काहीही उत्तर देत आली आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.