क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी ऐकावयास मिळत आहे. क्रिकेट इतिहासातील फिरकीचा जादूगार व ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे. ही घटना सर्व क्रिकेट प्रेमी साठी अत्यंत धक्कादायक आहे. कारण शेन वॉर्न याने त्याच्या क्रिकेट करियर मध्ये क्रिकेटला मोठे योगदान दिले होते व त्याचे नाव या खेळातील महान व्यक्तीच्या यादीत अग्रेसर आहे. परंतु, शेन वॉर्न च्या निधनापूर्वी त्याने केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Shane warne last post

 

दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी शेन वॉर्नचे निधन होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट जगतातील रॉड मार्श या क्रिकेटरचे निधन झाले होते. रॉड मार्श यांच्या निधनाची वार्ता समजल्यास शेन वॉर्नने आज सकाळीच एक भावूक पोस्ट केली होती. यात त्याने लिहिले होते, “रॉड मार्श यांच्या निधनाची वार्ता ऐकून दुःख झालं आहे. ते क्रिकेटमधील लेजंड होते आणि अनेक युवा मुला-मुलींसाठी प्रेरणा होते. रॉड यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना भरपूर काही दिले आहे. रॉस आणि त्याच्या परिवाराला खूप सारे प्रेम पाठवीत आहे. Rip Mate”

Shane warne last post

ही पोस्ट वाचून अनेकजण दुःख व्यक्त करीत आहेत. सकाळीच मित्राच्या निधनाबद्दल पोस्ट करणाऱ्या शेन वॉर्न हा स्वतःच जगाचा निरोप घेईल हे कोणत्याच क्रिकेटपटूला वाटले नसावे. शेन वॉर्नने त्याच्या क्रिकेट करियर मध्ये 145 टेस्ट सामने खेळताना तब्बल 708 विकेट घेतले तर 194 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 293 विकेट्स घेतले होते. क्रिकेटच्या या लेजेंडला “भावपूर्ण श्रद्धांजली”


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *