भारतात ज्यावेळी टिकटॉक चालू होते त्यावेळी अनेकजण रातोरात स्टार झाले होते. स्वतःच्या अंगात असणारे काही टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी लोक टिकटॉक या चायनीज ॲपचा वापर करायचे. याच ॲप मधून विष्णूप्रिया नायर नामक एक मुलगी खूपच व्हायरल झाली होती. फक्त एका व्हिडिओ मुळे तिचे लाखो फॉलोवर्स झाले होते.
टिकटॉक ॲप भारतात बॅन केल्यानंतर देखील विष्णूप्रियाचे इंस्टाग्राम व इतर ॲप वर लाखो फॉलोवर्स आहेत. मूळची केरळ राज्यातून असणारी व महाराष्ट्रात वाढलेल्या विष्णुप्रियाच्या “खुदा की इनायत” या गाण्यावरील व्हिडिओमुळे ती रातोरात स्टार झाली. सावळ्या रंगाची दिसणारी विष्णू प्रियाला तिच्या रंगावरून अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत असतो.
लोकमत सखीला दिलेल्या एका मुलाखतीत विष्णूप्रिया त्याबद्दल बोलताना दिसून आली. ती म्हणाली, “ही इतकी गोरी कशी झाली?, ही कोणती क्रीम लावते? अशा अनेक कमेंट्सचा मला सामना करावा लागला. मी सुरूवात केली त्यावेळी माझा रंग खूप सावळा होता. पण नंतर मी प्रॉपर डायट घेतल्याने मी गोरी झाली व त्यामुळेच माझे वजन देखील वाढले. त्यासोबतच मी फिल्टर पण वापरते आणि लाईट मेकअप पण करीत असते.
पुढे विष्णुप्रिया म्हणाली, “मला अजूनही कमेंट मध्ये लोक वाईट कमेंट करीत असतात. पण अशा लोकांना एकच सांगू इच्छिते की, तुम्ही ज्या कमेंट करता त्या कमेंट मुळे कोणाला वाईट नाही वाटलं पाहिजे, त्यांच्या फॅमिलीला वाईट वाटलं नाही पाहिजे. तुम्हाला जे वाईट वाटत असेल तर आम्हाला मेसेज करून सांगा की आम्हाला हे आवडलेले नाही. पण प्लीज तुम्ही वाईट शब्द वापरू नका” अशा शब्दात विष्णुप्रियाने ट्रोल करणाऱ्यांना विनंती केली.