माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला जवळपास 8 महिने उलटली असली तरीही या मालिकेची लोकप्रियता थोडीही कमी झाली नाही. अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोबतच मालिकेतील छोट्या परीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इतक्या कमी वयात ही चिमुकली अभिनयासोबतच डान्स मध्ये देखील परिपक्व आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे सारखे दिग्गज कलाकार असताना देखील परीने म्हणजेच मायराने आपला प्रभाव पाडला आहे. अनेक कलाकारांनी या चिमुकलीचे भरभरून कौतुक केले आहे. तिच्यातील अभिनय कौशल्य व निरागसपणा पाहून अनेकजण तिच्या प्रेमात पडले.
मायरा वायकुल ही चिमुकली सोशल मीडियावर देखील खूपच लोकप्रिय असून तिचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतात. सध्या मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असलेला मराठी चित्रपट चंद्रमुखी चित्रपटातील “चंद्रा” गाणे खूप चर्चेत आहे. याच गाण्यावरील मायराचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चंद्रा गाण्यावर अनेक मराठी कलाकार थिरकताना दिसून येत आहेत. त्यातच मायराची देखील भर पडली असून तिचे गोड हावभाव पाहून खरी चंद्रा असणाऱ्या अमृता खानविलकरला देखील तिचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. “ओ ग माझी गोंडस ग खूप खूप गोड. आय लव यू मायरा” अशा शब्दात अमृताने मायराच्या डान्सचे कौतुक केले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.