काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवर “माझ्या नवऱ्याची बायको” ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत राहिले असणार हे नक्की. आता याच मालिकेतील एका अभिनेत्रीचा सध्याचा चालू पाहून प्रेक्षक अचंबित झाले आहेत.

Shweta fitness news

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत राधिकाची जिवलग मैत्रीण रेवती ही होती. रेवतीचे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेनंतर श्वेताने छोट्या पडद्यावर काही वेळासाठी ब्रेक घेतला होता. ती सोशल मीडियावर देखील तितकी ॲक्टिव दिसून आली नव्हती. परंतु, काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला व त्यात तिचा वजन कमी झालेला लुक पाहून अनेकांना धक्का बसला.

Shweta fitness news

श्वेता ने 2019 नंतर फिटनेस कडे लक्ष देत स्वतःचे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता व तेंव्हा पासून आजपर्यंत तिचे बरेच वजन घटलेले फोटोत पाहता येऊ शकते. काही फॅन्स तिच्या नव्या लुकचे कौतुक करीत आहेत तर काही फॅन्स अगोदरचाच लुक छान होता असे म्हणत आहेत. श्वेता सोबतच तिचे पती राहुल मेहंदळे यांचे देखील बरेच वजन घटलेले दिसून येत आहे.

सध्या श्वेताने स्टार प्रवाह वाहिनीवरील “सहकुटुंब सहपरिवार” या मालिकेतून पुनरागमन केले आहे. या मालिकेत ती ज्योतीचे पात्र साकारताना दिसून येत आहे. गेल्या 2-3 वर्षात श्वेता मध्ये झालेला बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

Shweta fitness news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *